Home सामाजिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २९९ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २९९ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २९९ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

 

 

 

 

 

 

नागपूर,(प्रतिनिधी):- शुक्रवार दि.३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २९९ व्या जयंतीनिमित्त नागपूर मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  दिवाळीसारखा या दिवशी एका अद्भीतिय महिलेनं धनगर कुळात जन्म घेतला. त्यांच्या जन्मोत्सवाचा दिवस,धनगरांसाठीच नव्हे तर समस्त जनतेसाठी अभिमानाचा दिवस.त्याच्या कार्याचा गुणगौरवांचा गौरवशाली इतिहासांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या दिनाचे आयोजन.

Advertisements

 

दि. ३१ मे ला सकाळी ७ वाजता विधीवत पूजन करण्यात येणार आहे.यासाठी समस्त महिला भगिनी व पुरूष बांधव या कार्यक्रमाचे आयोजन करतात.तसाच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्म्रूती समीती षुरुष मंडळ व महिला मंडळ सौभाग्य नगर हुडकेश्वर रोड नागपूर येथे सहभागी होत आहेत. दिवसभर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता राॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ७ घोडे व त्यांवर वेगवेगळ्या वेषभुषेत स्त्रीया भाग घेणार आहे. त्यामध्ये लहानपणीची अहिल्या, तारुण्यातील अहील्या,राज्यकर्ती अहील्या,गौतमा,पार्वता, म्हाळसा,बाणू, खंडेराव, मल्हारराव होळकर , शंकर भगवान, विष्णूभगवान,श्रीक्रुष्ण इत्यादी.प्रामूख्याने आदर्शवत राज्यकारभार केला व २९ वर्षं प्रशासन केले.ते २९ वर्षं सर्वंच महिलांसाठी नाही तर समस्तांसाठी प्रेरणादायी, गौरवशाली आहे.

 

आदर्श राजकारणी अहिल्यादेवीच्या भूमिकेत सौ.वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या व अधीसेवीका भूमिका भूषविणार आहे.बाईक राॅली व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पून्हा सायंकाळी राॅली समापनानंतर देवीचे पूजन,आरती,पाळणा,स्वागत गित,व प्रतीज्ञा होणार आहे.सांस्क्रुतीक कार्यक्रमांमध्ये अहील्यादेविच्या जिवनावर आधारित सुमधुर गाणी,गितसंगित, पोवाडे, जोगवे, वाघ्या मूरळी गित,मी अहील्या बोलते. मी अहील्या होणार,मल्हारराव, खंडेराव यांच्यावर आधारित गितांची सरबरत असणार आहे.एकंदरीत गौरवशाली इतिहास दाखविल्या जाणार आहे.भरगच्च जन्मोत्सव जल्लोषात मातेचा साजरा केल्या जाणार आहे. यांमध्ये सौ वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या नागपूर पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ अध्यक्ष, ज्योती कापडे विद्या सोनाग्रे अश्विनी ऊरकुडे, संजीवनी घूरडे,कामीनी तवले,पूजा खूजे,संगीता खूजे,दिपाली घूरडे मिनाक्षी लोही, महादेव पातोंड, डॉ विनोद बरडे,अनील तांबडे,शरद ऊरकुडे,राम सोनाग्रे, हे पदाधिकारी या कार्यक्रमासाठी मेहनत घेणार आहेत.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements