रास्त भाव धान्य दुकानदारांना नवीन 4G पॉज मशीनचे वितरण
हातकणंगले, दि.28 : महाराष्ट्र शासनाने धान्य वितरण करण्यासाठी जुनी कालबाह्य टू जी 2G पॉज मशीन बदलून नवीन फोरजी 4G पॉज मशीन देण्यात आली.
हातकणंगले तालुका रास्त भाव धान्य दुकानदारांना नवीन मशीनचे वितरण जिल्हाध्यक्ष डॉ.रवींद्र मोरे व सचिव कॉ.चंद्रकांत यादव यांच्या हस्ते तहसील ऑफिसच्या सभागृहात वितरित पुरवठा निरीक्षक चंद्रकांत काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरित करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष श्रीपतराव पाटील, पुरवठा लिपिक सुनिता दिवटे,जिल्हा तांत्रिक कर्मचारी करण गायकवाड,सुभाष जाधव, प्रदीप खोजगे, राजू पाटील,धनाजी जाधव, किशोर पाटील, राजू आलासे, राजू जाधव, सलीम महालदार, पांडुरंग खोत, तसेच हातकणंगले तालुक्यातील सुमारे दीडशे रास्त भाव धान्य दुकानदारांना फोरजी 4G पॉज मशीन देण्यात आली सर्व दुकानदार उपस्थित होते.