अखेर मृत्यूशी झुंज अपयशी,आमदार पी.एन.पाटील यांची प्राणज्योत मावळली
कुंभोज , (प्रतिनिधी) कॉंग्रेसचे निष्ठावान नेते आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील MLA PN Patil यांची आज अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अॅस्टर आधार हॉस्पिटल Aster Aadhar Hospital येथे अखेरचा श्वास घेतला. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर मेंदूत झालेल्या रक्तस्त्रावर उपचार चालू होते. नाजूक परिस्थिती असताना त्यांच्यावर शर्तीने करण्यात आले पण त्याला अपयश आले . पी.एन.पाटील यांच्या निधनाने काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता हरवला असून यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
कोल्हापूरच्या राजकारणातील अध्वर्यू, काँग्रेसचे कट्टर समर्थक आणि गांधी घराण्याचे निष्ठावान असे ओळख असलेले करवीर विधानसभा मतदार संघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाची बातमी अखेर समोर येत आहे.घरी बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मोठी इजा झाली होती त्यामुळे त्यांना अॅस्टर आधार येथे दाखल करण्यात आले होते यावेळी त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झालेली आढळून आल्यानंतर त्या ठिकाणी मेंदूला सूज आल्याचे निदर्शनास आले. पी एन पाटील त्यांच्यावर शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. त्यांच्या उपचारासाठी मुंबईचे प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ.बराले Neuro surgeon Dr. Barale यांना कोल्हापुरात आणले होते . विनोद शिंगे कुंभोज