कोल्हापूरात आचार्य वेदवेदाचार्य विजय शास्त्री संगमुळये संतांचे आगमन

    Advertisements

    कोल्हापूरात आचार्य वेदवेदाचार्य विजय शास्त्री संगमुळये संतांचे आगमन

    Advertisements

     

     

     

    कोल्हापूर Kolhapur, दि.4: रोजी शुक्रवार पेठेतील शंकराचार्य मठामध्ये गुजरात नर्मदा परिसरातील योगीराज प्रतिष्ठान चे आचार्य वेदवेदाचार्य विजय शास्त्री संगमुळये आले आहेत. त्यांचे योगीराज प्रतिष्ठान अंतर्गत गुजरात नर्मदा परिक्रमेत दैनंदिन वैदीक षोडशउपचार पुजा अर्चा व अंदाजे 10 ते 15 हजार भावीकांना दररोज अन्नदान होत असते पुर्ण शुचिर्भुत पध्दतीने अंतरराष्ट्रीय वैदीक कार्य सुरू असते. अशा वेदाचार्य संताचे दर्शन कोल्हापूर नागरीकांना आज झाले.

    कोल्हापूर मध्ये आल्यानंतर श्री महालक्ष्मी दर्शन तसेच श्रीधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त रंक भैरव मंदिर शेजारी श्रीधर स्वामी मंदिरामध्ये त्यांचे आगमन झाले अ.भा. हिंदूमहासभा चे जिल्हा अध्यक्ष श्री. संदीप सासने साहेब (शिवाजी पेठ) व अ.भा. भ्रष्टाचार व अत्याचार विरोधी संघटनेच्या संस्थापक सौ. शोभाताई शेलार-पाटील, श्रीमती शीलाताई माने यांनी आयोजन केले होते हे. या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जगद्गुरु शंकराचार्य मठ शुक्रवार पेठ कोल्हापूर येथे केले होते. यावेळी शहर उपाध्यक्ष शरद ठाणेकर , विनोद चोपडे,सतिश कोरवी, योगेश पोवार, सुनिता भोसले,अपर्ना सावंत, विजय गुरव, विलासराव जाधव (सर), अविनाश शेलार (पत्रकार),जितेंद्र चव्हाण, बाबू चिले, महेश गंडमाळे आदी उपस्थित होते. अखिल भारत हिंदू महासभा व वैदिक सनातनी (हिंदू) ट्रस्ट यांच्या वतीने आयोजन केले आहे. या कार्यक्रमास कॅबीनेट मंत्री महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित होती आहेत. तरी जिल्हयातील शेकडो भावीकांनी संत दर्शनचा लाभ घेतला.

    कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आखिल भारत हिन्दू महासभा..

    Advertisements
    Advertisements