शिये हायस्कूल,ज्युनिअर कॉलेज शिये येथे ई-पिक पहाणी अँप प्रशिक्षण संपन्न

    Advertisements

    शिये हायस्कूल,ज्युनिअर कॉलेज शिये येथे ई-पिक पहाणी अँप प्रशिक्षण संपन्न

    Advertisements

     

    शिरोली: (प्रतिनिधी) मा.जिल्हाधिकारी श्री राहूल रेखावार यांचे आदेश व मार्गदर्शनानुसार ई-पिक पहाणी मोबाईल ॲप व्हर्जन 2 चा वापर करून शेतकऱ्यांनी चालू वर्षीची पिक पहाणी कशी नोंदवावी याचे प्रशिक्षण नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ शिये संचलित शिये हायस्कूल,ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थाना देण्यात आले. यानंतर प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भागातील शेतकऱ्यांना ई -पिक पहाणी नोंद करण्यासाठी सहकार्य करायचे आहे . प्रशिक्षण देणेसाठी मंडल अधिकारी . मा. विलास तोडकर ,तलाठी मा.युवराज केसरकर ,मा हरिष शिंदे, ऑपरेटर कृष्णात जाधव, कोतवाल स्वागत गुरव उपस्थित होते . स्वागत प्रा. संभाजी पुजारी यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.त्रिशला देसाई यानी केले . प्रा.शेखर आमले, जिमखाना विभाग प्रमुख संदिप पाथरे यांनी सहकार्य केले. प्राचार्य कृष्णात बसागरे यांनी आभार मानले . या कार्यक्रमास संस्था अध्यक्ष मा.श्री. दत्तात्रय गाडवे साहेब यांची प्रेरणा व सहकार्य लाभले .

    Advertisements
    Advertisements