स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एफ आर पी च्या आंदोलनाला कुंभोज शहर शिवसेनेचा जाहीर पाठिंबा
कुंभोज :वार्ताहर (विनोद शिंगे) कुंभोज तालुका हातकणंगले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झालेल्या एफ आर पीचा जागर या मेळाव्या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या सर्वांगीण हितासाठी करण्यात येत असणाऱ्या जागर एफ आर पीचा व शेतकऱ्यांच्या खात्यावर पन्नास हजार सानुग्रह अनुदान तसेच ऊस तोडणी मुजरा कडुन होणारा शेतकऱ्यांना नाहक त्रास प्रसंगी ऊस तोडणी मजुरांना कोणत्याही पद्धतीचा ऊस तोडणी साठी पैसे द्यायचे नाहीत जो शेतकरी पैसे देईल त्या शेतकऱ्याचा ऊस पेटवून घातला जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला सदर ठराव बहुमताने मंजुर करण्यात आले.
सदर निर्णयाला पाठिंबा म्हणून कुंभोज शहर शिवसेनेच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांना पुढिल आंदोलनासाठी पाठिंबा देण्यात आला सदर पाठिंबाचे निवेदन कुंभोज शहर शिवसेनेची शहराध्यक्ष निवास माने शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांना देण्यात आले. यावेळी कुंभोज शहर शिवसेनेचे अध्यक्ष निवास माने ,युवा नेते तेजस कोळी, सुरेश भगत तात्यासो हराळे, दिपक कोळी,प्रियदर्शन पाटील, प्रतीक नकाते, सुभाष देवमोरे किरण माळी ,प्रकाश पाटील, तसेच कुंभोज शहर शिवसेनेचे विविध शाखांची पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुंभोज शहर शिवसेनेने घेतलेल्या निर्णयाचे शेतकरी वर्गाने टाळ्यांच्या गजरात स्वागत करून राजू शेट्टी यांनी कुंभोज शहर शिवसेनेच्या निवेदनाचे स्वीकार करून त्यांचे स्वागत केले.