किराणा दुकान,सुपर मार्केट मधील वाइन विक्रीचा आदेश रद्द न केल्यास आंदोलन

    Advertisements

    किराणा दुकान,सुपर मार्केट मधील वाइन विक्रीचा आदेश रद्द न केल्यास आंदोलन भ्र.वि.जनआंदोलन न्यास इचलकरंजी

    इचलकरंजी: (प्रतिनिधी)  किराणा दुकान तसेच सुपर मार्केट मधील वाइन विक्रीचा निर्णय रद्द न केल्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आदेशानुसार आंदोलन करण्यात येईल असा इशारा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास इचलकरंजी शहर शाखेच्या वतीने निवेदनाद्वारे प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांना देण्यात आला.
    महाराष्ट्र सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या नावाखाली फक्त महसूल वाढीच्या दृष्टीने सदर निर्णय घेण्यात आला असून कांदा उत्पादक व इतर शेतकऱ्यांची काळजी सरकार करत नाही. वाइनच्या सर्व प्रकारामध्ये 4 % पासून ते 60% पर्यंत  अल्कोहोल असून यामुळे अनेक संसार देशोधडीस लागले आहेत तर गुन्हेगारी कारवायात वाढ झालेली आहे.त्यामुळे गैरप्रकार वाढू नये म्हणून सदर आत्मघातकी निर्णय रद्द करावा यासाठी आमच्या भावना शासनापर्यत पोहोचवाव्यात अन्यथा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सूचनेनुसार सदर निर्णयाचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आंदोलने करण्यात येणार आहेत असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
    यावेळी भ्रष्टाचार विरोधी जनानंदोलनाचे मन्सूर अत्तार,हरीश देवाडिगा,राजु कोन्नुर,महेंद्र जाधव,संकेत गजबी,अरिहंत पटवा,दिपक पंडित,सुनील भाकरे,अभिजित पटवा आदी उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements