तळसंदे येथे भटका समाज मुक्ती आंदोलनच्या वतीने उद्या निर्धार मेळावा- भिमराव साठे(बापू)

    Advertisements

    तळसंदे येथे भटका समाज मुक्ती आंदोलनच्या वतीने उद्या   निर्धार मेळावा–
    संस्थापक भिमराव साठे (बापू)यांची माहिती-

    Advertisements

    नवे पारगाव , : तळसंदे (ता.हातकणंगले) येथे भटका समाज मुक्ती आंदोलन या राज्यस्तरीय संघटनेच्या वतीने उद्या मंगळवार (ता.८) दुपारी २ वाजता कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित केला असल्याची माहिती अध्यक्ष भिमराव साठे यांनी दिली.
    यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार राजूबाबा आवळे यांचा संघटना व मातंग समाज संघर्ष समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार असून कोल्हापूरच्या आई फौडेशनच्यावतीने निराधार गरजु महिलाना ब्लँकेट वाटप करण्यात येणार आहे.गोरगरीबाना शासनाकडील जमीन व त्यांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी या निर्धार मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे भिमराव साठे यांनी सांगितले.
    तळसंदे येथील अमला आश्रम जवळील ज्ञानचंदा हॉल येथे दुपारी दोन वाजता होणाऱ्या निर्धार मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून वडगावचे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, वडगांव युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे, गटनेते अजय थोरात, शिवाजीराव आवळे, रमेश चांदणे, सुरेश महापुरे,रमेश डोंगरे, शामराव मोरे यासह आई दुर्गा फौंडेशनच्या अध्यक्षा अश्विनी डेंगे उपस्थित राहणार आहेत. तरी या निर्धार मेळाव्यास सर्वानी उपस्थित राहण्याचे अवाहन भिमराव साठे यांनी केले.

    Advertisements
    Advertisements