कोरे दंत महाविद्यालयात मुख आरोग्य दिन व कर्करोग दिनानिमित्त विविध उपक्रम
नवे पारगाव: (प्रतिनिधी संतोष जाधव) नवे पारगावा (ता. हातकणंगले ) येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयात मुख आरोग्य दिन व जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले .
चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या . स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला . महाविद्यालयातील आंतरवासिता विद्यार्थ्यांच्या वतीने पथनाट्य सादर करणार आले. मौखिक आरोग्य संबंधित मार्गदर्शन आणि समुपदेशन पदवीत्तर डॉक्टरांनी केले.
जागतिक कर्करोग दिनानिमित्त दंत महाविद्यालयात कर्करोगाची कारणे, लक्षणे व त्याच्यावर चे उपाय याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. आंतरवासिता डॉक्टरांकडून कर्करोग प्रबोधन या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन प्रतिनिधी डॉ .शिल्पा कोठावळे ,प्राचार्य डॉ. हरीश कुलकर्णी , डॉ. अभिजीत शेटे, डॉ.योजना पाटील व डॉ.प्रज्ञा ,डॉ.स्वाती ,डॉ. डेविड,डॉ.स्मिता आणि शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.