Advertisements
कोल्हापूर बोर्ड विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची पाटण केंद्रास भेट
Advertisements
पाटण : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित पाटण (जि.सातारा) येथील कै.ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज संकुलातील दहावी केंद्रास एसएससी – एचएससी बोर्डाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष सन्माननीय राजेश क्षीरसागर यांनी आज भेट दिली. संकुलाचे प्राचार्य दिलीपराव चरणे यांनी क्षीरसागर साहेब यांचे स्वागत केले.
केंद्रावरील परीक्षेसाठीच्या पर्याप्त सोयी सुविधा, कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा यासंदर्भात कामकाजाची माहिती घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. पाटणच्या कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर मॅडम यावेळी उपस्थित होत्या. क्षीरसागर साहेब व बोरकर मॅडम यांनी वर्ग खोल्यांची पाहणी करत असताना विद्यार्थ्यांशीही संवाद साधत हितगुज केले.
Advertisements
Advertisements