Home कोल्हापूर जिल्हा खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते मनोज पाटील यांचा सत्कार

खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते मनोज पाटील यांचा सत्कार

Advertisements

खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते मनोज पाटील यांचा सत्कार

Advertisements

 

 

कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-कोल्हापुरातील कावळा नाका येथील छ. ताराराणी चौकात कोल्हापूरचे सुपुत्र मनोज पाटील यांचा सत्कार खासदार धैर्यशील माने यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी त्यांनी संपादन केलेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले व पुढील उज्ज्वल कारकिर्दीसाठीच्या शुभेच्छा दिल्या.

मनोज यांनी आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने २२ डिसेंबर या दिवशीच्या गोरेगाव, मुंबई येथे पार पडलेल्या भारत प्रो शो या Men’s Physique स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्यांच्या या कामगिरीने त्यांची आंतरराष्ट्रीय “मिस्टर ओलंपिया” स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हि स्पर्धा ऑक्टोबर २०२५ मध्ये अमेरिकेतील लास वेगास येथे होणार आहे. मनोज पाटील हे या स्पर्धेसाठी पात्र होणारे महाराष्ट्रातील पहिले खेळाडू आहेत, हि आपणा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पुढील स्पर्धेत पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी करून कोल्हापूरचे आणि पर्यायाने महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचवावे असे मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले.

Advertisements
Advertisements