Home Breaking News वडगाव प्रीमियर क्रिकेट लीगचे मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्या हस्ते उदघाटन

वडगाव प्रीमियर क्रिकेट लीगचे मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्या हस्ते उदघाटन

Advertisements

वडगाव प्रीमियर क्रिकेट लीगचे मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्या हस्ते उदघाटन

Advertisements

 

पेठवडगाव : येथील छत्रपती श्री शाहू मैदान नागोबा वाडी येथे वडगाव क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित वडगाव प्रीमियर लीग 2024 या भव्य क्रिकेट स्पर्धेच शुक्रवारी (दि.27) वडगाव नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्या हस्ते उदघाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अशोक चौगुले,कर्णसिंह भोसले, डॉ.भोई,डॉ.निकम,उद्योजक पाटील,सुनील कुडाळकर, संतोष लडगे,सुजित माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस देशाची माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग, शहीद जवान व दिवंगत देशवासी यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ग्रामदैवत श्री महालक्ष्मी प्रतिमेचे व मैदानाचे पूजन करून उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी प्रास्ताविक करताना वडगाव क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संताजी भोसले सर यांनी सर्वांचे स्वागत करून मुख्याधिकारी जाधव यांना मैदानाच्या दुरावस्थेबद्दल माहिती देऊन सदर मैदान लवकरात लवकर आम्हाला सर्व सोयीने अध्यायवत करून खेळण्यास उपलब्ध करून द्यावे ही विनंती केली.                                            मुख्याधिकारी जाधव यांनी पुढच्या वर्षी अद्यावयत झालेल्या नवीन मैदानावरती ही स्पर्धा आयोजित केली जाईल असे आश्वासन दिले.                      तसेच माजी उपनगराध्यक्ष अशोक चौगुले यांनी या मैदानाच्या उभारणीसाठी सर्व प्रकारचे भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले.

पहिला सामना सलगर स्लोगर्स विरुद्ध सम्राट डिफेंडर्स यांच्यात झाला या सामन्यात सलगर स्लोगर्स या संघाने विजय मिळवून आघाडी घेतली. संपूर्ण दिवसभरामध्ये एकूण पाच सामने पार पडले. प्रेक्षकांना सामने पाहण्यासाठी प्रेक्षा गॅलरी उभा करून सोय केली आहे. या प्रेक्षा गॅलरीला असोसिएशनचे दिवंगत संचालक धनाजी केर्लेकर यांचे नाव देण्यात आले आहे. ज्या लोकांना सामने पाहण्यासाठी मैदानावरती येणे शक्य नाही अशा लोकांसाठी घरबसल्या मोबाईलवर युट्युबच्या माध्यामातून थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली आहे.

या उद्घाटन समारंभासाठी स्पर्धेतील दहा संघाचे संघ मालक असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व संचालक आयोजन समितीचे सर्व सदस्य स्पर्धेला सहकार्य केलेले सर्व पुरस्कर्ते सर्व संघातील खेळाडू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष अमित शिंदे, प्रथमेश गायकवाड व समिती सदस्य असोसिएशनचे संतोष माळी, संतोष देसाई प्रवीण शिंदे,सुकुमार देसाई हे पाहत आहेत.

आभार प्रदर्शन असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ.सुरज कुडाळकर यांनी मानले.

Advertisements
Advertisements