पाटण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मंगळवार पासून
पाटण : सातारा जिल्हा परिषद सातारा,शिक्षण विभाग पंचायत समिती पाटण व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित कै. ज्ञानोजीराव साळुंखे शैक्षणिक संकुल पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे पाटण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मंगळवार दि. १० ते गुरुवार दि. १२ डिसेंबर अखेर असल्याची माहिती पाटणच्या गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर व कै. ज्ञानोजीराव साळुंखे शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य दिलीपराव चरणे यांनी दिली.
कै. ज्ञानोजीराव साळुंखे शैक्षणिक संकुलात होणाऱ्या पाटण तालुक्यातील सर्व शाळांचा प्रदर्शनात सहभाग आवश्यक असणार आहे.
मंगळवारी (दि.१०) दुपारी दोन वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. याच दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत सहभागी शाळांनी विद्यार्थी व शिक्षक यांची नोंदणी करून आपल्या उपकरणांची मांडणी करून घ्यायची आहे.
. बुधवार (दि.११) व गुरुवार (दि.१२) डिसेंबर रोजी परीक्षण होईल. गुरुवारी दुपारी उपकरणाचे तज्ञ परीक्षकांच्या कडून परीक्षण केले जाईल . तिसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारी 3-00 वाजता सांगता समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होईल.
दुसऱ्या दिवशी बुधवार विज्ञान प्रदर्शन अंतर्गत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व प्रश्नमंजुषा या स्पर्धा होतील. एका शाळेतून विविध गटात सहभाग असेल तर प्रत्येक उपकरणाची स्वतंत्र नोंदणी विहित शुल्कासह करावी. पाटण तालुक्यातील सर्व शाळांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी श्रीम. दीपा बोरकर यांनी केले आहे.