Home Breaking News तळसंदे येथे धोकादायक विद्युत पोल , महावितरणचे दुर्लक्ष 

तळसंदे येथे धोकादायक विद्युत पोल , महावितरणचे दुर्लक्ष 

Advertisements

तळसंदे येथे धोकादायक विद्युत पोल , महावितरणचे दुर्लक्ष

Advertisements

 

 

 

नवे पारगाव : हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील मुख्य रस्त्यापासून जवळच महावितरण कंपनीचा विद्युत वाहक लोखंडी खांब सडला असून तो धोकादायक अवस्थेत आहे. हा लोखंडी खांब बदलण्याची मागणी शेतकर्यांच्याकडून वारंवार केली जात आहे. तळसंदे वारणा रस्त्यालगतच हॉटेल जोतिबा शेजारी असणाऱ्या शिवाजी संकपाळ यांच्या ऊसाच्या शेतातून जाणारी सरूड लाइनवर ३३ के.व्हि. विद्युत भार आहे. येथील लोखंडी विद्युत खांब मागील काही वर्षांपासून खालून तळातून सडलेल्या अवस्थेत असल्याने तो धोकादायक बनला आहे. शेतीची मशागत करताना ट्रॅक्टर अथवा अन्य शेती अवजाराचा धक्का लागताच लोखंडी खांब जर कोसळला तर तो जीवघेणा ठरू शकतो. याची माहिती संबंधित शेतकऱ्याने इतरांनी महावितरणला वारंवार दिली आहे . परंतु महावितरण ने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे काही ठिकाणी विद्युत स्पार्किंगमुळे अनेक वेळा ऊसाला आग लागण्याच्या घटना घडत असतात व यामुळे अशा दुर्घटना घडण्या आगोदर महावितरणने वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Advertisements
Advertisements