इनामचे ठिय्या आंदोलन स्थगित…

    Advertisements

    इनामनचे ठिय्या आंदोलन स्थगित….

    Advertisements

     

     

    इचलकरंजी Ichalkaranji ,(प्रतिनिधी) :- 68 शुद्धपेयजल प्रकल्प कार्यान्वित झाले असून इतर प्रकल्प टप्प्याटप्प्याने 2 महिन्यात सुरू करणार असल्याचे आश्वासन इचलकरंजी महानगरपालिकेचे Corporation जलअभियंता सुभाष देशपांडे Subhash Deshpande यांनी दिल्यानंतर इचलकरंजी नागरिक मंचचे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.

    साडे तीन वर्षांपूर्वी आमदार प्रकाश आवाडेंनी MLA Prakash Awade मंजुर केलेल्या व 3 वर्षांपूर्वी कार्यादेश दिलेले काम अपूर्ण असून सदर कामाची मुदत 5 जानेवारी रोजी संपणार असल्याने याबाबत मागील वर्षी इनामने निवेदन दिले होते. त्यावर काही कारवाई न झाल्याने 11 डिसेंबर रोजी इनामने निवेदन देऊन आयुक्त ओमप्रकाश दिवटे,उपायुक्त सोमनाथ आढाव यांना निवेदन देऊन 8 दिवसात प्रकल्प सुरू करा अन्यथा आंदोलन करणार असल्याचे कळवले होते,त्यानंतर महापालिका प्रशासनाचे 21 डिसेंबर रोजी मोघम पत्र आले होते.26 डिसेंबर रोजी इनामने महापालिका प्रशासनास विविध 4 मुद्द्यांचे स्पष्टीकरण न झाल्याने 28 तारखेला पाणीपुरवठा विभागात ठिय्या मारणार असल्याचे कळवले होते.यानंतर सावध झालेल्या महापालिका प्रशासनाने इचलकरंजी नागरिक मंचला विविध मागण्यांसाठी चर्चेस पाचारण केले.यावेळी सुभाष देशपांडे व अंकिता मोहिते यांनी केलेल्या चर्चेत

    1.कार्ड बाबत वर्तमानपत्र, सोशल मिडियाद्वारे व घंटागाडीद्वारे जनजागृती करणे यासाठी वर्तमानपत्रातून प्रसिद्धी दिली आहे,तर घंटागाडी वर स्लोगन तयार करून दिले असून 2 दिवसात ते सुरू होईल.सोशल मिडियाद्वारे जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या असून याबाबत अंकिता मोहिते स्वतः बाईट देतील.

    2.सुरू असलेल्या प्रकल्पाची यादी कळवणे.-यादी वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे, सूचना फलक व पाणीपुरवठा विभागात ती बघायला मिळणार असल्याचे स्पष्ट केले.

    3.जागा व लाईट पाणी नसलेल्या ठिकाणाबाबत त्वरित निर्णय घेणे,याबाबत 5 ठिकाणी लाईटचे प्रॉब्लेम असून ते 2 दिवसात दूर करून प्लॅन्ट सुरू करत आहोत,15 ठिकाणी मोटर पडलेली असून त्यासाठी अंदाजपत्रक तयार केलेले आहे त्याची तांत्रिक मान्यता घेतलेली असून आठवड्याभरात टेंडर प्रसिद्ध करत असून प्रक्रिया पूर्णं करून आचारसंहिता कालावधी वगळून 2 महिन्यात काम पूर्ण करत असल्याचे तोंडी सांगितले

    4.काम सुरू करण्यास अडचणी असलेल्या ठिकाणी काम सुरू करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे- उर्वरित 11 पैकी 9 ठिकाणी काम सुरू केले 2 ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून 1 महिन्यात काम पूर्ण करत असल्याचे कळवले आहे.समाधानकारक चर्चा झाल्यानंतर इनामने कार्डविक्री बाबत महापालिकेने तत्पर रहावे तसेच पुर्ण प्रक्रियेवर आमचे लक्ष राहणार असून यामध्ये कोणताही हलगर्जीपणा चालणार नसल्याचा अटीवर आंदोलन स्थगित केले.लेखी पत्र जलअभियंता सुभाष देशपांडे यांनी इनामच्या शिष्टमंडळास दिले.

    शिष्टमंडळात सुहास पाटील,राजु कोन्नुर,राजुदादा आरगे,अमोल ढवळे, अमृत पारख,नितीन ठिगळे,कल्पना माळी,मीना कासार, रुपाली माळी,डॉ.सुप्रिया माने, संतोष साळुंखे,राम आडकी,अभिषेक भोपळे ,रविंद्र(बाळु)भंडारी,हरीश देवाडिगा, सचिन बाबर,महेंद्र जाधव,बाळासाहेब नरशेट्टी,अभिजित पटवा उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements