दक्षिण विधानसभा मतदारसंघातील  लाभार्थ्यांना स्वखर्चातून आभा. कार्ड देणार- अमल महाडिक

    Advertisements

    दक्षिण विधानसभा मतदारसंघातील  लाभार्थ्यांना स्वखर्चातून आभा.कार्ड देणार- अमल महाडिक

    Advertisements

     

     

     

    कुंभोज,प्रतिनिधी(विनोद शिगे):-सर्वसामान्य गोरगरिबांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना आणली आहे. या अंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार होणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान भारत कार्ड Aabha Card असणे आवश्यक आहे.

    सर्वसामान्य लोकांना घरबसल्या आयुष्मान भारत कार्ड मिळावे या हेतूने माजी आमदार अमल महाडिक यांनी स्वखर्चातून हे कार्ड्स वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 24 हजार पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी येणारा सर्व खर्च माजी आमदार अमल महाडिक यांनी उचलला असून लवकरच घरोघरी ही कार्ड वितरित केली जाणार आहेत.

    दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बूथ रचनेच्या माध्यमातून घरोघरी हे कार्ड्स वितरित केले जातील. केंद्र शासनाची ही अभिनव योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा अमल महाडिक यांचा प्रयत्न आहे.

    आयुष्मान भारत कार्ड घरबसल्या मिळाल्यामुळे लाभार्थ्यांची धावपळ वाचणार असून भविष्यात चांगल्या आरोग्यविषयक सेवेचा लाभ त्यांना घेता येणार आहे.

    Advertisements
    Advertisements