Home कोल्हापूर जिल्हा कुंभोज येथील शिंदे गट व जनस्वुराजची युती आगामी जिल्हा परिषद,पंचायत समितीचे आकर्षण

कुंभोज येथील शिंदे गट व जनस्वुराजची युती आगामी जिल्हा परिषद,पंचायत समितीचे आकर्षण

Advertisements

कुंभोज येथील शिंदे गट व जनस्वुराजची युती आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आकर्षण

Advertisements

 

 

कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-कुंभोज तालुका हातकणंगले येथील उद्धव ठाकरे गटाचे माजी शिवसेना शहरप्रमुख निवास माने व जनस्वुराज्य शक्ती पक्षाचे वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांची झालेली युती एक उल्लेखनीय ठरत आहे. परिणामी निवास माने यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहरप्रमुख पदाचा राजीनामा देऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे काम कुंभोज येते अन्य सहकाऱ्यांच्या माध्यमातून चालू केले. त्यासाठी त्यांना माझी जिल्हाप्रमुख व गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांचे सहकार्य लाभले. परिणामी महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात फूट पडल्यानंतर निवास माने यांनी ठाकरे गटाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काम करण्यास सुरुवात केली. परिणामी बघता बघता लोकसभेची निवडणूक जाहीर झाली त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या जनसुराज पक्षाच्या माध्यमातून धैयशील माने यांच्या विजयासाठी कुंभोज व परिसरात आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत काम करण्यास सुरुवात केली व त्यामध्ये त्यांना यश प्राप्त झाले धैयशील माने हे खासदारकीला विजयी झाले.

बघता बघता काही काळ उरकला व विधानसभेची निवडणूक ही जाहीर झाली सदर विधानसभेच्या निवडणुकीत कुंभोज येथे जनसुराज्य, एकनाथ शिंदे गट भाजप व अन्य मित्र पक्षांनी एकत्र मिळून डॉक्टर अशोक माने यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान केले व त्यात अशोक माने यांना कुंभोज सह परिसरात मोठे मताधिक्य मिळाले. व अशोक माने हे तब्बल चाळीस हजार मताधिक्य घेऊन आमदार झाले.

परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते व जनस्वुराज्य पक्षाची झालेली ही युती येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नक्कीच फायदेशीर ठरणार असून येणाऱ्या काळात ही युती अशीच राहावी असे अनेक जाणकारांचे मत व्यक्त होत आहे. परिणामी निवास माने यांनी केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटातील प्रवेशाने तसेच त्यांना लाभलेल्या जनशराज्य शक्ती पक्षाचे वारणा दूध संघाचे सचालक अरुण पाटील यांच्या सहकार्यामुळे शिंदे शिवसेनेची ताकद कुंभोज सह परिसरात वाढत असून त्याला आता जनसुराज्य भाजपचे सहकार्य मिळाले आहे. परिणामी ही ताकद येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत नक्कीच फायदेशीर ठरणार असल्याचे चित्र दिसत असून माने व पाटील यांची युती नक्कीच फायदेशीर ठरेल असे जाणकारांची मत व्यक्त होत आहे.

Advertisements
Advertisements