राष्ट्रीय एकात्मिक दिनानिमित्त कोल्हापूर आगारात एकतेची दिली शपथ
पेठ वडगाव,(मोहन शिंदे) :- इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आगार व्यवस्थापक(वरिष्ठ) अनिल म्हेत्तर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर आगारात सामूहिक शपथही घेतली.
राज्य परिवहन कोल्हापूर आगारात झालेल्या कार्यक्रमाला आगार व्यवस्थापक(कनिष्ठ) प्रमोद तेलवेकर, स्थानकप्रमुख मल्लेश विभुते, कार्यशाळा प्रमुख संकेत जोशी,राजाराम शेटे,लेखकार रामभाऊ पोळ,वाहतूक निरीक्षक अनिल सुतार व सारंग जाधव,सहाय्यक वाहतूक निरीक्षक दिपक घारगे,वाहतूक नियंत्रक सांगावकर, उत्तम पाटील, पाळीप्रमुख किरणकुमार कमलाकर यांचेसह सर्व कार्यशाळा कर्मचारी उपस्थित होते.
‘राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी आम्ही स्वतःला समर्पित करू. तसेच देशवासियांमध्ये हा संदेश पोचविण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करू. आम्ही ही शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहोत, जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाले आहे. तसेच देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता आम्ही स्वतःचे योगदान देण्याचा सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहोत,’ अशी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ कोल्हापूर आगारातील अधिकारी आणि कार्यशाळा कर्मचाऱ्यांनी घेतली.