Advertisements
विश्वम इंडस्ट्रीज मध्ये खंडे नवमी उत्साहात
Advertisements
शिरोली,(प्रतिनिधी):- शिरोली एम.आय.डी.सी. येथील विश्वम इंडस्ट्रीज मध्ये शनिवारी पारंपरीक पद्धतीने यंत्रपूजन करून खंडेनवमी उत्साहात साजरी करण्यात आली.
कामगार अधिकारी वर्गामार्फत यंत्रपूजन आणि सामुदायिक पूजा करण्यात आली तसेच प्रवेशद्वारावर रांगोळी व फुलांची सजावट करून यंञाची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. याप्रसंगी कामगारांना मिठाईचे वाटप करण्यात आले. निखिल जामदार यांनी कंपनीच्या भविष्यातील वाटचाली बद्दल कामगारांना मार्गदर्शन केले.
यावेळी अमृता जामदार,निकिल काटकर,सुरज जमादार,राहुल पाटील,सतिश पाटील,विशाल तुंरबेकर, प्रविण केकरे,प्रकाश पेटकर,वल्लभ माने,अमोल कुंभार,पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते.
Advertisements
Advertisements