Advertisements
ए.जे.सोशल वेलफेअर फाउंडेशन आयोजित युवा संवाद २०२४ संपन्न
Advertisements
कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-ए.जे.सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने आयोजित युवा संवाद २०२४ गतिमान युगाकडे वाटचाल या विशेष कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक उपस्थित होत्या. स्त्रीशक्ती आणि कायदा तसेच राजकीय सामाजिक मार्गदर्शन या विषयांवर आधारित चर्चासत्रांमध्ये भुयेवाडीच्या सरपंच राणी पाटील, फेथ फाऊंडेशनचे अध्यक्ष राज कोरगावकर, प्रेम भोसले, माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे, रोहित पाटील, ए. जे. सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. अबोली जिगजिनी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
युवा वर्गाशी विवीध विषयांवर झालेल्या चर्चेतून नवी ऊर्जा मिळाली. नव्या कल्पनांचा जागर या संमेलनातून झाला.
Advertisements
Advertisements