कुंभोज परिसरात प्रवासासाठी एसटी एक आणि प्रवासी अनेक

    Advertisements

    कुंभोज परिसरात प्रवासासाठी एसटी एक आणि प्रवासी अनेक

    Advertisements

     

    कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-कुंभोज तालुका हातकणंगले येथे विद्यार्थी व प्रवाशांना वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस फारच कमी पडत असून ,कुंभोज गावची लोकसंख्या जवळजवळ वीस हजार इतकी आहे. पण सदर गावातून इचलकरंजी वडगाव ,कोल्हापूर ,हातकणंगले या ठिकाणी कॉलेज साठी जाणाऱ्या युवक व युवतींची संख्या फारच मोठी आहे .त्याचप्रमाणे हातकणंगले व कागल एमआयडीसी काम करण्यासाठी जाणाऱ्या महिलावर्ग व पुरुष वर्गाची संख्या ही फारच मोठ्या प्रमाणात आहे . कुंभोज येथे दिवसातून बोटावर मोजण्या इतक्याच बसेस प्रवासी वाहतूक करतात त्यात शासनाने महिलांना मोफत प्रवास केला असल्याने एसटी बसेस मधून प्रवास करण्यासाठी अनेक महिला तासंतास कुंभोज एसटी स्टँडवर रेंगाळत उभ्या राहिलेल्या दिसत आहे. त्यामुळे शिक्षणासाठी व नोकरीसाठी बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असून याबाबत एसटी महामंडळात अनेक वेळा निवेदन व राजकीय व्यक्तीने शिफारस करूनही कोणताही परिणाम झालेला नाही.
    परिणामी सकाळपासून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची रेलचेल बाहुबली विद्यापीठ येथे शिक्षणासाठी होत असते. सध्या एसटी स्टँड परिसरात एसटी एक व प्रवासी अनेक अशी अवस्था निर्माण झाली असून. एसटी महामंडळाने कुंभोज पासून वडगाव इचलकरंजी व अन्य ठिकाणी जाण्यासाठी बस संख्या वाढवण्याची मागणी कुंभोज ग्रामस्थ विद्यार्थ्यांची यांच्यातून होत असून, एका बाजूला शासन नागरिक व विद्यार्थ्यांना अनेक सेवा सुविधा देत असून त्या सेवा सुविधा पुरविण्यात मात्र शासन असमर्थ ठरत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे.

    पत्रकार विनोद शिंगे,कुंभोज.

    Advertisements
    Advertisements