एम जी शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज बाहुबली मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
हातकणंगले,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज बाहुबली मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाले. ध्वजपूजन व ध्वजारोहण मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांनी केले. यावेळी उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीत गायिले. महाराष्ट्र छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली. यावेळी सायली अनुसे, आफिया तांबोळी, समर्थ वाघदरी, समीक्षा अनुसे व श्रुतिका पाटील या विद्यार्थ्यांनी विविध भाषांमधून आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. महेक मुलाणी या विद्यार्थिनीने देशभक्तीपर गीत गायन सादर केले. यावेळी इंग्रजी स्पेलिंग पाठांतर स्पर्धेचे पुरस्कार वितरण करण्यात आले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी स्मिता निटवे व शरद जुगळे यांनी सूत्रसंचालन केले.