अंकिता गुरव यांची जलसंपदा विभागात मोजणीदार पदी निवड

    Advertisements

    अंकिता गुरव यांची जलसंपदा विभागात मोजणीदार पदी निवड

    Advertisements

     

     

     

    नवे पारगाव , ता.५ : चावरे (ता. हातकणंगले) येथील अंकिता सुदर्शन गुरव यांची सरळ सेवा परीक्षेतून जलसंपदा विभागात मोजणीदार म्हणून निवड झाली.

    अंकिता यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मसुचीवाडी (जि. सांगली), उच्च व पदवीपर्यंतचे शिक्षण इस्लामपूर येथे झाले. विवाहानंतर त्यांनी सरळ सेवा परीक्षेतून जलसंपदा विभागात मोजणीदार पदाची परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या.

    त्यांना बंधू अतूल विष्णूपंत गुरव यांचे मार्गदर्शन, पती सुदर्शन, सासरे शिवाजी गुरव, सासू माजी सरपंच शारदा गुरव यांचे सहकार्य लाभले.

     

    Advertisements
    Advertisements