अभिजीत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

    Advertisements

    अभिजीत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

    Advertisements

     

     

     

     

     

     

     

     

    पेठ वडगांव :(प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते व श्री शाहू शिक्षण संस्थेचे कार्यवाह श्री अभिजित गायकवाड ( दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त अभिजीत दादांच्या समर्थकांनी गुरुवारी (ता.18) पेठ वडगांव येथील श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्था संचलित केंद्रीय अनु.जाती निवासी प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले.

    या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष अभिजित पोळ , मिणचे गावचे उपसरपंच श्री अभिनंदन शिखरे सामाजिक कार्यकर्ते श्री शितल कोळी, श्री प्रविण पाटील ,पत्रकार श्री मोहन शिंदे आणि अंकुर भोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    या वेळी इयत्ता 1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले होते. शाळेसमोरील आवारात या वह्यांचे आणि खाऊचे वाटप करण्यात आले असून शाळेतील अनेक गरजू विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

    याप्रसंगी माळी सर , युवा कार्यकर्ते दिग्विजय जाधव, रोहित पाटील, अभी पाटील ,सुहास कदम, शाळेतील शिक्षक, शिक्षिका आदी मान्यवर उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements