Home Breaking News कल्याणी शिशू विहार मध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात

कल्याणी शिशू विहार मध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात

Advertisements

कल्याणी शिशू विहार मध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात

Advertisements

 

 

पेठ वडगाव : येथे आषाढी एकादशी निमित्त बळवंतराव यादव मराठी शाखा संलग्न कल्याणी शिशू विहार यांच्या वतीने आयोजित  दिंडी सोहळा उत्साहात पार पडला.

याचेच औचित्य साधून येथील कल्याणी शिशु विहारच्या बालचमुनी दिंडीचे आयोजन केले होते. विठ्ठल, रुक्मिणी, विविध संतांची मांदियाळी, हातात टाळ घेतलेले वारकरी, यांच्या सुंदर वेशभूषा करून विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते.

टाळांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात पारंपारिक वेशभूषा आणि टाळांच्या गजरात निर्माण झालेल्या भक्तिमय वातावरणामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्याणी शिशुविहार च्या मुख्याध्यापिका गिरीजा देवस्थळे, शिक्षिका सुप्रिया महाजन, संद्या लोळगे, महानंदा चौगुले, निर्मला शिंदे ,दिपाली पाटील यांनी विषेश प्रयत्न केले.

Advertisements
Advertisements