Home कोल्हापूर जिल्हा कुंभोज येथे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असणाऱ्या मोहरम सणाला सुरुवात

कुंभोज येथे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असणाऱ्या मोहरम सणाला सुरुवात

Advertisements

कुंभोज येथे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असणाऱ्या मोहरम सणाला सुरुवात

Advertisements

 

 

 

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे):- कुंभोज येथे ढोल-ताशाच्‍या निनादात भक्तीमय वातावरणात पंचवीसहून अधिक पंजांची विधीवत प्रतिष्‍ठापना केली.हिंदु-मुस्‍लिम ऐक्‍याचे प्रतिक म्‍हणून कुंभोज येथील मोहरम परिचित आहे.गावातील सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येवून मोहरम साजरा करण्‍याची परंपरा आहे. शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत आज मानाचे पंजे हजरत शहाखताल साहेब यांच्या दर्ग्याजवळ ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आले. यावेळी शेकडो नागरिकांनी सदर मानाच्या पंजाचे स्वागत केले. यावेळी हजरत शहाखताल कमिटी व मुजावर मोहल्ला यांच्या वतीने गावातील सर्वच मानाच्या पंजांचे मानाचा फेटा व हार देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील विविध करबल मेलनी आपले करबल सादर केली. हातकलंगले तालुक्यात अत्यंत प्रसिद्ध असणाऱ्या हिंदू मुस्लिम एकतेचे प्रत्येक म्हणून कुंभोजचा मोहरम सण साजरा केला जातो. यामध्ये मुस्लिम बांधवांच्या बरोबरच इतर सर्व समाज मोठ्या प्रमाणात सामील होतो. गावातील सर्वच मानाचे पंजे मसुदी कट्टा येथील शाही मज्जीदिला भेट देऊन आपापल्या ठिकाणी विराजमान झाले. हा भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी रस्त्यावरती आपली गर्दी केली होती.

 

गावातील सर्व पंजे येथील श्रध्‍दास्‍थान हजरत शाह खताल हुसेन दर्ग्‍यात आले.पंजांनी बाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.दर्गा प्रांगणात झालेल्‍या कार्यक्रमांत नूर हुसेन,पंजतन,शाह खताल,शाही मशीद,सकलातसो व बाबुजमाल करबल मंडळांनी करबल खेळाचे सादरीकरण केले.करबल मेलच्‍या उस्‍तादांनी हजरत इमाम हुसेन व त्‍यांच्‍या अनुयायांच्‍या स्‍मरणार्थ रिवायती सादर केल्‍या.रविवारी (ता.१४)पंजे भेटीचा कार्यक्रम होईल.मंगळवारी (ता.१६)खत्तलरात्र होईल.यावेळी खाई फोडण्‍याचा कार्यक्रम होईल.बुथवारी (ता.१७)दुपारी गावातील सर्व पंजे आदिनाथ चौकातील शाही मशिदीत येतील येथे करबल व बुरुज खेळाचा कार्यक्रम होईल.यानंतर विसर्जन मिरवणूकीस प्रारंभ होईल.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात अंतिम भेटीचा सोहळा होईल.सायंकाळी हजरत शाह खताल हुसेन दर्गा प्रांगणात पंजे विर्सजन कार्यक्रम होईल.चाँद मुजावर,हारूण मुजावर,शक्रुद्‍दीन मुल्‍ला,मुबारक मुल्‍ला,गफूर सुतार,राजू सुतार, मुनीर सुतार,सुरज हराळे,सुनिल डोणे,राजकुमार अल्‍ल,गौस सुतार,अस्‍लम पठाण,इम्रान नदाफ,राहुल माळी उपस्‍थीत होते.

Advertisements
Advertisements