Home Breaking News अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडिया सदस्यांना ओळखपत्र वितरण सोहळा उत्साहात

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडिया सदस्यांना ओळखपत्र वितरण सोहळा उत्साहात

Advertisements

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडिया सदस्यांना ओळखपत्र वितरण सोहळा उत्साहात

Advertisements

 

 

कोल्हापूर,(प्रतिनिधी ):- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मिडिया सदस्यांना ओळखपत्र वितरण नुकतेच एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले. हा सोहळा कोल्हापूर येथील छ.शाहू स्उमारक भवन येथे उत्साहात पार पडला असून, डिजिटल पत्रकारितेला अधिक मान्यता देण्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची पाऊलवाट ठरली आहे.

कार्यक्रमाच्या प्रमुख व्यासपीठावर परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त शरदजी पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, अधिस्वीकृती समितीचे मुंबई विभागीय अध्यक्ष दीपक कैतके, लातूर विभागीय अध्यक्ष विजयकुमार जोशी, कोल्हापूर विभागीय सचिव चंद्रकांत क्षीरसागर हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यातील परिषदेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि डिजिटल मिडियाशी संबंधित पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाद्वारे डिजिटल पत्रकारांच्या योगदानास मान्यता देत त्यांना अधिकृत ओळखपत्र देण्यात आले. ही ओळखपत्रे म्हणजे पत्रकारांच्या अधिकृततेचे प्रतीक असून, त्यांचा सामाजिक सहभाग अधिक प्रभावी होण्यासाठी ती उपयुक्त ठरणार आहेत, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत नेटकेपणाने करण्यात आले असून, उपस्थित सदस्यांनी परिषदेच्या पुढील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आश्वासन दिले.

 

Advertisements
Advertisements