Home Breaking News निलेवाडी येथे कॉंक्रिटीकरण रस्त्याचे उदघाटन

निलेवाडी येथे कॉंक्रिटीकरण रस्त्याचे उदघाटन

Advertisements

निलेवाडी येथे कॉंक्रिटीकरण रस्त्याचे उदघाटन

Advertisements

 

 

 

नवे पारगाव : निलेवाडीनिलेवाडी तालुका हातकणंगले येथील मोहिते गल्ली रस्ता कॉंक्रिटीकरण साठी 15 लाख रुपये किमतीच्या कामास सुरुवात आमदार डॉ. अशोकराव माने यांनी आपल्या निलेवाडी गावात आमदार झालेनंतर पहिलाच निधी मोहिते गल्ली येथे काँक्रीट रस्ता करणे साठी तब्बल 15 लाख रुपये दिला आहे त्यामुळे गावकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.

 

सदर रस्त्याचा प्रश्न बरेच दिवस प्रलंबित होता ग्रामपंचायतीच्या वतीने माननीय आमदारांना या संदर्भात निवेदन दिल्यानंतर त्यांनी तात्काळ या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून कामासाठी सुरुवात केलेली आहे . भविष्यात निलेवाडीला पूरग्रस्त गाव असल्यामुळे निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन आमदार माने यांनी दिली आहे. काँक्रिटीकरण उद्घाटन तंटामुक्त समिती अध्यक्ष बाजीराव शेळके यांच्या हस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी सरपंच माणिक घाटगे, उपसरपंच शहाजी बोरगे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुभाष भापकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाजीराव शेळके, ग्रामपंचायत सदस्य अमर घाटगे , बबन टोपुगडे ,छत्रपती शिवाजी सोसायटी चेअरमन प्रकाश भोसले, दीपक जाधव, राजेंद्र मोहिते, रवींद्र मोहिते व ग्रामस्थ उपस्थित होतेgm.

Advertisements
Advertisements