कृषीकन्याचा आधुनिक शेतीचा मंत्र ; कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव उपक्रम
नवे पारगाव,(वार्ताहर ):- तळसंदे (ता.हातकणंगले ) येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषि महाविद्यालय, कोल्हापूर येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव उपक्रम राबविला ’ विविध शेती प्रश्नावर गावात बळीराजाशी संवाद साधला .
या शैक्षणिक उपक्रमांतर्गत कु. वृषाली आवटे, कु. सांची ढोबळे , कु.विद्या जाधव, कु. वैष्णवी भांगे ,कु. वैभवी घाडगे कु. वैष्णवी अनुसे व कु. प्रतिक्षा कदम,या कृषी कन्यांनी गावात राहून.शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधत आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती देण्याचा संकल्प केला आहे.
या उपक्रमात १८ प्रकारच्या प्रगत कृषि तंत्रज्ञानाचे थेट प्रात्यक्षिके शेतकऱ्यांसमोर मांडली जाणार आहेत. माती परीक्षण, पीक संरक्षण, सेंद्रिय शेती, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर, बाजारभाव, जनावरांची काळजी व संगोपन आणि महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. या कृषिदूतांचा मुख्य उद्देश गावातील शेती व्यवस्था, शेतकऱ्यांच्या अडचणी, जीवनशैली, सामाजिक-आर्थिक स्थिती आणि पीक पद्धतीचा बारकाईने अभ्यास करणे हाच असून त्यातून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे..
यावेळी सरपंच शुभांगी कुंभार, उपसरपंच संतोष सुवासे सर्व सदस्य ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
या उपक्रमाचे नियोजन आणि मार्गदर्शन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पिसाळ , कार्यक्रम समन्वयक प्रा. इंगळे , कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. टी. कोलगणे यांच्यासह इतर विषयतज्ञ करणार आहेत.