Home Breaking News अंबपच्या लोकनियुक्त सरपंच दिप्ती माने यांचा पतीसह अवयवदान संकल्प

अंबपच्या लोकनियुक्त सरपंच दिप्ती माने यांचा पतीसह अवयवदान संकल्प

Advertisements

अंबपच्या लोकनियुक्त सरपंच दिप्ती माने यांचा पतीसह अवयवदान संकल्प

Advertisements

 

 

 

 

पेठ वडगांव,(प्रकाश कांबळे):-अंबप (ता.हातकणंगले) येथील लोकनियुक्त सरपंच दिप्ती विकासराव माने यांनी वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण देह दानाचा निर्णय आपल्या पती विकासराव माने यांच्यासोबत घेऊन समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
अवयवदान यांसारख्या सामाजिक कार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी देह उपलब्ध होतील, ज्यामुळे समाजाला मोठा फायदा होईल. आपल्या मरणौतर इतरांना नवीन जीवन मिळा वे या उद्देशाने त्यांनी काल रविवारी १५ जून आपल्या वाढदिवसा दिवशी मरणोत्तर देहदनाचा निर्णय घेऊन आपले पती विकासराव माने व मुलगा ज्योतिरादित्य यांची सहमती घेतली. यानंतर पती विकासराव माने यांनीही त्यांचा सोबत आपल्याही मरणोत्तर देहदान करत दोघांनीही एकत्रितपणे नोंदणी केली. सरपंचांनी घेतलेला हा निर्णय, समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे.

यावेळी सरपंच दिप्ती माने म्हणाल्या कि मृत्यूनंतर अवयव दानातून अनेकांना नवजीवन येऊ शकते या संकल्पनेतून आज 15 जून 2025 माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून मी व माझे पती आम्ही दोघांनी अवयव दानाचा संकल्प केला आहे अवयव दान म्हणजे अमूल्य जीवनदान हे केवळ दान नसून ते दुसऱ्या व्यक्तीला नवजीवन देण्याचे कार्य आहे.
अवयव दान करण्याचा संकल्प अंबप ग्रामपंचायत कार्यालयामध्ये करण्यात आला यावेळी उपसरपंच आशिफ मुल्ला यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements