Home Breaking News अबंप येथे कृषी कन्यांचे उत्साहात स्वागत

अबंप येथे कृषी कन्यांचे उत्साहात स्वागत

Advertisements

अबंप येथे कृषी कन्यांचे उत्साहात स्वागत

Advertisements

 

वाठार, (प्रकाश कांबळे):- अबंप ता.हातकणंगले येथे ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थीनी कृषी कन्या म्हणून ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम पार पडला.
या कृषी कन्यांचे ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी स्वागत केले कृषी कन्या सहा महिने गावात राहून शेतकऱ्यांच्या अडचणी व त्यांचे जीवनमान, गावातील पीक पद्धती यांचा अभ्यास करतील. तसेच विविध प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके दाखवणार आहेत. यावेळी सरपंच दिप्ती माने, उपसरपंच आशिफ मुल्ला,प्रगतशील शेतकरी विश्वनाथ पाटील, डॉ. प्रदीप साळोखे, ग्रामपंचायत सदस्य व कृषी कन्या श्वेता धनके, स्वाती जाधव,श्रुती कांबळे, पुजा शिंदे, श्रद्धा उगले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements