राहूल रेखावार यांच्यावर कारवाई करा – संयुक्त शिक्षण संघटना वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
कोल्हापूर /(प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संसोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेचे संचालक राहूल रेखावार यांच्यावर कारवाई होणेसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्हयातील शिक्षण क्षेत्रातील सर्व कार्यरत संयुक्त संघटना वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून लेखी निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.
लेखी निवेदनातील आशय असा की,
दि. ०२ जून २०२५ ते दि. १२ जून, २०२५ पर्यंत वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण राज्यभर चालू होते. या प्रशिक्षणामधील कडक शिस्तीमुळे व हुकुमशाही वृत्तीमुळे अनेक प्रशिक्षणार्थी शिक्षकांना या प्रशिक्षणास मुकावे लागले आहे. कारण प्रत्येक तासाला ऑनलाईन हजेरी सक्तीची केली होती व ती सही अपलोड झाली नसेल तर संबंधित शिक्षकांना प्रशिक्षणातून लीव्ह (Leave) करण्याचे आदेश SCERT चे संचालक राहूल रेखावर यांनी दिलेले होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर अतिनिर्बंध लादले गेले. या विहित वेळेत पोहोचण्याच्या भितीपोटी चिपळून ते रत्नागिरी येथे प्रशिक्षणासाठी जात असताना मिनी बसचा अपघात होऊन ३० शिक्षक जखमी झाले व त्यातील काही गंभीर जखमी शिक्षक मृत्यूशी झुंज देत आहेत.
यास केवळ SCERT चे संचालक राहूल रेखावार यांचा हेकेकोरपणा कारणीभूत आहे. या अपघातानंतर सध्या राहुल रेखावर यांनी या अपघाताचा आणि प्रशिक्षणाचा काहीही संबंध नाही असे धक्कादायक विधान देवून आपली असंवेधनशीलता सिद्ध केलेली आहे. त्याच्या या हिटलरी वृत्तीमूळे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण आनंददायी होण्या ऐवजी त्रासदायक झाले.
अनेक संघटनांनी मागणी करूनही किरकोळ ५/१० मिनीट लेट आलेल्या शिक्षकांच्या अनुउपस्थितिचा कालावधी क्षमापित केलेला नाही. तर त्यांना या प्रशिक्षणातून Leave करून परत घालविले आहे. तसेच वेळेत लिंक ओपन न झाल्याने व सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑनलाईन मूल्यमापनाचा फज्जा या प्रशिक्षणामध्ये उडालेला आहे. या सर्वास संचालक राहूल रेखावार यांचे असहिष्णूता कारणीभूत आहे. म्हणून आम्ही या निवेदनाव्दारे मागणी करतो की, किरकोळ अनुपस्थितीचा कालावधी क्षमापित करून शिक्षकांना हे प्रशिक्षण पूर्ण करू द्यावे व SCERT चे संचालक राहूल रेखावार यांच्यावर कारवाई करावी व त्यांच्याकडून SCERT चा कारभार काढून घ्यावा अशी आग्रही मागणी या निवेदनाव्दारे आम्ही करत आहोत. अध्यक्ष एस. डी. लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड, सचिव आर. वाय. पाटील, भरत रसाळे , सुधाकर निर्मळे, खंडेराव जगदाळे, संतोष आयरे, सुधाकर सावंत, मिलींद बारवडे ,उमेश देसाई ,राजेंद्र कोरे, आर डी पाटील, प्रा. सी एम गायकवाड,’राजाराम वरुटे, राजेश वरक, विलास पिंगळे ,दिलीप माने,शिवाजी भोसले , महादेव डावरे , सविता गिरी, सुभाष जाधव, बाबा पाटील, मनोहर जाधव, संजय पाटील, सुरेश संकपाळ, आदिसह अन्य मान्यवर.