Home Breaking News मनपाडळे येथे पाण्यात बुडून बैलाचा मृत्यू

मनपाडळे येथे पाण्यात बुडून बैलाचा मृत्यू

Advertisements

मनपाडळे येथे पाण्यात बुडून बैलाचा मृत्यू

Advertisements

 

 

नवे पारगाव : हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथे तलावात जाखले (ता.पन्हाळा) येथील शेतकरी सुरज पाटील यांच्या बैलजोडीतील एक बैलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली.
जाखले येथील शेतकरी सुरज पाटील हे मनपाडळे गावच्या पश्चिमेस असणाऱ्या शेतात खरीप पूर्व मशागती करत असताना मशागत करून झाल्यानंतर बैलांना पाणी देण्यासाठी बैलजोडी मनपाडळे तलावापाशी आणली व पाणी पिताना दोन्ही बैल तलावात गेले सोबत बैलगाडी असल्याने बैलांना बाहेर येता आले नाही यावेळी या शेतकऱ्याने आरडा ओरडा केल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी जमून बैलाच्या गळ्यातील दोरी कापून एक बैल वाचवला पण दुसरा वाचवण्यात त्यांना अपयश आले
यामध्ये संबंधित शेतकऱ्याचे सुमारे एक लाख तीस हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पंचनामा करणारे पशुवैद्यकीय अधिकारी व तलाठी यांनी स्पष्ट केले.

Advertisements
Advertisements