Home Breaking News वाठार ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ.अश्विनी कुंभार यांची बिनविरोध निवड

वाठार ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ.अश्विनी कुंभार यांची बिनविरोध निवड

Advertisements

वाठार ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ.अश्विनी कुंभार यांची बिनविरोध निवड

Advertisements

 

 

पेठ वडगांव : वाठार तर्फ वडगांव (ता.हातकणंगले) वाठार ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी सोमवारी झालेल्या विशेष सभेत सौ.अश्विनी दिलीप कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंचपदासाठी एकूण तीन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते, मात्र दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सौ. कुंभार यांचा एकमेव अर्ज राहिला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच तथा निवडणूक अधिकारी सचिन कांबळे यांनी जाहीर केले.

या निवडीप्रसंगी वाठार ग्रामपंचायतीमध्ये उत्साही वातावरण होते. वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे, सूर्यकांत शिर्के, राजाराम क्षीरसागर, बी. एस. पाटील, माजी प्रभारी सरपंच महेश कुंभार, राहुल पोवार, सदस्या सुशीला चौगुले, महेश शिर्के, रेश्मा शिंदे, नाजुका भुजिंगे, तेजस्विनी वठारकर, रुकसाना नदाफ, तसेच रमेश गायकवाड, अभिजीत सुतार, सुशील जिवरसकर, राजकुमार शिंदे, गोरखनाथ शिंदे, विनायक माळी, राजेंद्र शिर्के, संतोष वठारकर, संदीप पाटील, गणेश कुंभार, असिफ पटाईत आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामविकास अधिकारी डी..डी. शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. नव्याने निवड झालेल्या सौ. अश्विनी कुंभार यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या

Advertisements
Advertisements