Home Breaking News शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे व शैक्षणिक समस्या सोडविणे यास प्राधान्य- नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी...

शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे व शैक्षणिक समस्या सोडविणे यास प्राधान्य- नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ.सुवर्णा सावंत

Advertisements

शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे व शैक्षणिक समस्या सोडविणे यास प्राधान्य-
नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ.सुवर्णा सावंत

Advertisements

 

कोल्हापूर,(प्रतिनिधी):-माझ्याकडे प्रशासकिय अनुभव पुष्कळ असल्याने या जिल्हयातील शैक्षणिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच शैक्षणिक गुणवत्तेचा अधिकाधिक विकास करणे यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. माझ्या कामात सर्व शिक्षक शिक्षकेत्तर संघटनांनी सहकार्य करावे, असे उदगार जिल्ह्याच्या नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत यांनी काढले.

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने अध्यक्ष एस. डी. लाड यांच्या हस्ते माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ.सुवर्णा सावंत यांचा सत्कार करून स्वागत केले. या प्रसंगी एस. डी. लाड यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक ज्वलंत समस्या स्पष्ट करून त्या सोडविण्यास प्रयत्नशील राहूया अशी विनंती केली.
तसेच नूतन उपशिक्षणाधिकारी रवींद्र चौगले यांचाही सत्कार एस. डी. लाड यांच्याहस्ते करण्यात आला.या प्रसगी उपशिक्षणाधिकारी अजय पाटील, अधिक्षक प्रविण फाटक, विस्तार अधिकरी डी. ए. पाटील आदी उपस्थित होते.

या शिष्टमंडळात प्रा. सी. एम. गायकवाड, सुधाकर निर्मळे,आर. डी. पाटील, राजेश वरक, मिलींद बारवडे, मनोहर जाधव, आर. बी. पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Advertisements
Advertisements