Home Breaking News वाठार गावचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देणार : सरपंच सचिन कांबळे

वाठार गावचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देणार : सरपंच सचिन कांबळे

Advertisements

वाठार गावचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देणार : सरपंच सचिन कांबळे

Advertisements

 

 

वाठार, (प्रकाश कांबळे):- वाठार ता. हातकणंगले येथे 15 वा वित्त आयोग योजनेतील बंधित निधीमधून पाण्याच्या टाकी येथे वृक्षारोपण केलेल्या झाडांना व छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर असलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी बसवण्याच्या टाकी कामाचा शुभारंभ प्रसंगी बोलताना सरपंच सचिन कांबळे म्हणाले की वठार गावच्या विकास कामावर भर देऊन गावचा कायापलट कारणार आहे त्याच बरोबर गावातील मूलभूत असणारे रस्ते गटर्स ही कामे लवकरच पुर्ण करून गावचा सर्वांगीण विकास करणाऱ्यावर भर देणार आहे.

यावेळी टाकी बांधण्याच्या जागेचे पूजन ग्रा पं सदस्या सौ रुकसाना नदाफ यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी युवा उद्योजक शरद बेनाडे, उपसरपंच सौ रेश्मा शिंदे, ग्रा पं सदस्य सुहास पाटील,सचिन कुंभार, ग्रामविकास अधिकारी डी डी शिंदे, महेश जगताप, पत्रकार प्रकाश कांबळे, विनायक शेटे, अश्वमेध स्पोर्ट्सचे अध्यक्ष अमोल लठ्ठे,सुनील पाटील, बाळकृष्ण सूर्यवंशी, सुरेश नरके,कॉन्टॅक्टर अभयसिंह थोरात,महेश दबडे, आप्पासो दबडे,सागर पाटील यांच्या सह अश्वमेध स्पोर्ट्सचे खेळाडू उपस्थित होते.

Advertisements
Advertisements