Home Breaking News साईभक्त आप्पासाहेब गायकवाड यांना ‘राष्ट्रीय हिंदू समाजरत्न पुरस्कार जाहिर

साईभक्त आप्पासाहेब गायकवाड यांना ‘राष्ट्रीय हिंदू समाजरत्न पुरस्कार जाहिर

Advertisements

साईभक्त आप्पासाहेब गायकवाड यांना ‘राष्ट्रीय हिंदू समाजरत्न पुरस्कार जाहिर

Advertisements

 

 

टोप /(वार्ताहर):- येथील साई मंदिर चे संस्थापक साईभक्त आप्पासाहेब गायकवाड यांना शनि शिंगनापूर येथील आखिल भारतीय हिंदू राष्ट्र समितीच्या वतीने दिला जाणारा ‘राष्ट्रीय हिंदू समाजरत्न पुरस्कार २०२५’जाहिर करण्यात आला. जाहिर झाल्याचे पत्र समितीचे प्रमुख भागवताचार्य ह.भ.प.अतुलमहाराज आदमाने शास्त्री यांनी नुकतेच साई मंदिर येथे देण्यात आले.
साई भक्त आप्पासाहेब गायकवाड हे गेली २७ वर्षे हजारो साईभक्तांना स्वखर्चातून श्री साईबाबांचे दर्शन घडवतात. हे दरवर्षी या दिंडी सोहळ्यात 900 महिला साई भक्त व 300 पुरुष साईभक्तांचा सहभाग असतो. सर्व महिलांना भगवी साडी, भगवी टोपी, भगवा ध्वज, व पुरुष साई भक्तांना पांढरा ड्रेस असतो. शिर्डी मध्ये हजारो दिंड्या येत असतात पण शिस्तबद्ध एक सारखा पेहराव असल्याने या दिंडीचे शिस्तबद्ध दिंडी म्हणून कौतुक केले आहे. शिर्डी संस्थान कडूनही विशेष गौरव केला आहे. टोप साई मंदिरात शिर्डी साई मंदिरातील दिनक्रमाप्रमाणे धार्मिक विधी पार पाडले जातात. हिंदू धर्माविषयी असलेले प्रेम,सामाजिक निष्ठा, सामाजिक उपक्रम तसेच हिंदू समाजा करीता दिलेले योगदान या सर्व उपक्रमाची दखल घेत हा पुरस्कार जाहिर केल्याचे ह. भ. प. अतुल महाराज आदमाने शास्त्री यांनी सांगितले.
या पुरस्कार वितरण सोहळा रामेश्वरम तामिळनाडू येथे पदमश्री पोपटराव पवार, शिर्डी देवस्थान चे विश्वस्त खा. भाऊसाहेब वाकचौरे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प.गहनींनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते व गीता परिवारचे कोषाध्यक्ष वल्लभ व्यास,आखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ डिसेंबर २०२५ मध्ये देण्यात येणार आहे. यावेळी शिर्डी साई मंदिर चे पुजारी बाळासाहेब जोशी,डॉ.डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे मा. ट्रस्टी सूर्यकांत तोडकर, ह.भ.प.भिकाजी शिंदे,पंडीत चौगले,विनय खोत, माणिकचंद नाईक, तेजस गायकवाड यांच्यासह साईभक्त आदी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements