कोल्हापूरात एस टी महामंडळाचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पेठ वडगांव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ७७ वा वर्धापन दिनाच्या औचित्य साधून मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सजवलेल्या एस टी बस सहित सर्व कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर बस स्थानक ते दसरा चौक पदयात्रा काढली.
यानंतर विविध मान्यवरांची मनोगते पार पडली, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय बहनजी डॉ. रश्मी यांनी एसटीचा ७७वा वर्धापन दिन म्हणजे एसटी आणि प्रवासी हे ७७वर्ष साथ साथ प्रवास करत आलेले आहेत अशीच घोडदौड कायम राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या, कॉम्रेड अशोक जाधव यांनी एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नेहमीच प्रवासी सेवेसाठी सर्वस्वी योगदान दिले आहे, या जीवावरच आज एसटी महामंडळाची यशस्वी वाटचाल चालू असल्याचे म्हटले.
कार्यशाळा अधीक्षक विजय निगडे यांनी ७७ व्या वर्षी देखील एसटी तरुण दिसण्यामागे सर्वच कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे म्हटले. विभाग नियंत्रक ( प्रभारी) यशवंत कानतोडे, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, आगार व्यवस्थापक(व) अनिल मेहतर आगार व्यवस्थापक (क) प्रमोद तेलवेकर यांनी सर्व कर्मचारी प्रवासी यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन, रा.प महामंडळाच्या जडणघंडीत असेच योगदान देण्याचे आवाहन केले.
यानंतर बसस्थानकावर प्रवासासाठी उपस्थित जेष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापून लाल परी चा वाढदिवस साजरा करण्यात आला व सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन दुचाकी रॅली काढून दसरा चौकातील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मध्यवर्ती बस स्थानक ते दसरा चौक -जिल्हाधिकारी कार्यालय -धैर्यप्रसाद हॉल -ताराराणी चौक मार्गे मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी रॅलीची सांगता करून, बसस्थानक प्रमुख मल्लेश विभुते यांनी सर्वांचे आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी भांडार अधिकारी संग्राम शिंदे, वाहतूक निरीक्षक अनिल सुतार,व सारंग जाधव,स.वा.निरिक्षक दीपक घारगे,प्रभाकर राजू शेटे,शेखर सुर्वे, अमित तावडे, वाह.नियंत्रक इफरान सांगावकर, उत्तम पाटील,दिपक सनगरे,श्रीमती संजीवनी ढोणे यांच्यासह चालक वाहक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी प्रवासी मित्र, संघटना प्रतिनिधी, एसटी प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.