Home Breaking News गाव तिथे युवासेना शाखा ही संकल्पना राबवून शिवसेना अधिक मजबूत करू–शिवाजी जाधव

गाव तिथे युवासेना शाखा ही संकल्पना राबवून शिवसेना अधिक मजबूत करू–शिवाजी जाधव

Advertisements

गाव तिथे युवासेना शाखा ही संकल्पना राबवून शिवसेना अधिक मजबूत करू–शिवाजी जाधव

Advertisements

 

 

 

हुपरी, (प्रतिनिधी):-शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   CM Eknath Shinde व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे  MP dr Shrikant Shinde यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गाव तिथे युवासेना शाखा’ ही संकल्पना राबवून शिवसेना Shivsena अधिक मजबूत करू. त्याचबरोबर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभेत तरुणांची मजबूत फौज उभी करत युवासेनेचा वेगळा ठसा दाखवण्यासाठी युवासैनिकांनी कार्यरत राहावे, असे आवाहन युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांनी केले. रेंदाळ (ता.हातकणंगले ) येथे आयोजित युवासेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक व सचिव किरण साळी यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे जाळे महाराष्ट्रभर पसरले असून हातकणंगले लोकसभा क्षेत्रातही आपली चांगली ताकद आहे. येणाऱ्या काळात ‘गाव तिथे युवासेना शाखा’ ही संकल्पना हाती घेत युवासेनेच्या सर्वच शाखांनी शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून विद्यार्थी,शिक्षण,उद्योग यांसह समाजातील प्रमुख प्रश्नांवर अग्रभागी राहावे. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या लोकोपयोगी योजना व उपक्रम घरोघरी पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहावे अशी भावनाही शिवाजी मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केली.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ‘हातकणंगले’मधील शिवसेनेच्या विजयात युवासेनेच्या पदाधिकारी व युवासैनिकांनी विशेष कामगिरी केली आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघातील शिवसेनेचे भविष्य उज्ज्वल असून संघटना बांधणी हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवत सर्वांनी कामाला लागावे. संघटना बांधणी मजबूत करत शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांचे हात अधिक बळकट करत महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याचा निर्धारही पदाधिकारी बैठकीत करणात आला.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे, युवासेना जिल्हाप्रमुख निशिकांत पाटील, युवतीसेना जिल्हाप्रमुख सलोनी शिंत्रे यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक अजित उगळे यांनी केले.

 

 

 

Advertisements
Advertisements