भाजपा युवा मोर्चा तर्फे वडगावात नाना पटोले यांचा जाहीर निषेध
पेठ वडगांव,(प्रकाश कांबळे) :- काँग्रेस आय चे Congress l महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सामान्य ओबीसी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्यामुळे ओबीसी समाजाच्या मोठा अपमान करून ओबीसी OBC बांधवांच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्याबद्दल त्याचा जाहीर निषेध भाजपा BJP तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील(दादा)यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी युवा मोर्चा पूर्व जिल्हाध्यक्ष डॉ.अरविंद माने,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तय्यब कुरेशी,अनुसूचित जिल्हाध्यक्ष संतोष वाठारकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विश्वास माने(आप्पा),महिला उपजिल्हाध्यक्ष सौ.सुरेखा सूर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष धनंजय गोंदकर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सलीम मुलानी, शहर अध्यक्ष जगन्नाथ माने, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष अमर पाटील, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस प्रथमेश शिंदे, विकास कांबळे, राजेंद्र जाधव,राजेंद्र बुरुड, ओबीसी मोर्चा सरचिटणीस संतोष माळी, युवा मोर्चा चिटणीस पियुष सावर्डेकर,अजय मोरे ओंकार मिरजकर प्रणव राठोड,सत्यजित पाटील तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.