नागरिकांनीच भरले रस्त्यावरील खड्डे

    Advertisements

    नागरिकांनीच भरले रस्त्यावरील खड्डे  कासारवाडी फाट्यावर पाणी व खड्यांची समस्या, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

    Advertisements

     

    कासारवाडी, प्रतिनिधी (किशोर जासूद):-  टोपहून कासारवाडी या महामार्गावर कासारवाडी फाट्याला ठिकठिकाणी खड्डे पडले असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघातही होत आहेत.

    पुणे बेंगलुरु राष्ट्रीय महामार्गालगत तूप येथून कासरवाडी मार्गे जाणारा राज्य मार्ग आहे राज्यमार्ग जोतिबा पन्हाळा सह रत्नागिरी महामार्गाला जाऊन मिळतो. कासारवाडी फाट्यालाच रस्त्यावर खड्डे पडले आहेत यावर उन्हाळ पावसाळी वर्षभर या रस्त्यावर पाणी राहते पावसाळ्यात थोडा जरी पाऊस आला तरी आजूबाजूला नाले नसल्याने त्याच्यावर पाणी येते तर उन्हाळ्यात रस्त्याला लागून असणाऱ्या पाणीपुरवठा पाईपला गळती असल्याने भर उन्हाळ्यात सुद्धा रस्त्यावर पाणी साचते यामुळे इथला खड्डा अधिकच मोठा होत चालला आहे. याचा त्रास येथून प्रवास करणाऱ्या असंख्य वाहनधारकांना होत होता हे पाहून कासारवाडीचे तंटामुक्त अध्यक्ष संतोष शिंदे व टोपचे वैभव पाटील यांनी आज स्वखर्चाने हे खड्डे मुरूमाने भरले आहेत यामुळे प्रवाशाना थोडासा दिलासा मिळणार आहे.

     

    प्रतिक्रिया –

    उन्हाळ्यात व पावसाळ्यात सुध्दा या रस्त्यावर पाणी साचत असल्याने खड्डा अधिकाधिकच मोठा होत होता. यावर पाणी आल्याने नवीन वाहन चालकांना याचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात होत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे वेळेची लक्ष द्यावे.

     

    संतोष शिंदे- अध्यक्ष,तंटामुक्त समिती, कासारवाडी

    Advertisements
    Advertisements