Home Breaking News डी. वाय. पाटील बी. टेक. ॲग्रीच्या माजी विद्यार्थ्यांचे ‘एम.पी.एस.सी.’ मध्ये यश

डी. वाय. पाटील बी. टेक. ॲग्रीच्या माजी विद्यार्थ्यांचे ‘एम.पी.एस.सी.’ मध्ये यश

Advertisements

डी. वाय. पाटील बी. टेक. ॲग्रीच्या
माजी विद्यार्थ्यांचे ‘एम.पी.एस.सी.’ मध्ये यश

Advertisements

 

 

 

तळसंदे :- डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तळसंदे (बी.टेक. ॲग्री) महाविद्यालयाच्या इंजि. शुभम पाटील व इंजि. मेघा वाबळे या दोन माजी विद्यार्थ्यानी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एम.पी.एस.सी.) परीक्षेत यश मिळवले आहे.
शिक्षणाच्या गुणवत्तेसोबतच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या प्रयत्नांचे फलित यशस्वी ठरत आहे. महाविद्यालयातील माजी विद्यार्थी इंजि. शुभम पाटील आणि इंजि. मेघा वाबळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

२०१३-२०१७ च्या बॅचच्या शुभम पाटील यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे. तर २०१८- २०२२ च्या बॅचच्या इंजि. मेघा वाबळे हिने उप मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक या दोन पदांसाठी यश मिळवले आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले असून महाविद्यालयातर्फे त्यांचे अभिनंदंद करण्यात आले.

प्राचार्य डॉ. सुहास पाटील म्हणाले, महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, त्यासाठी पूरक वातावरण, व्याख्याने यांचे आयोजन केले जाते. याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. आमचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात यश मिळवत असून, हे आमच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रतिक आहे. शुभम आणि मेघा यांचे यश हे पुढील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी शुभम व मेघा यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Advertisements
Advertisements