बिन खांबी गणेश मंदीर, सरस्वती टॉकीज चौकात वि. दा सावरकर नामफलक नव्याने लावण्यात यावा -अखिल भारत हिंदू महासभेेची मागणी
कोल्हापुर :- येथील ताराबाई रोड सरस्वती चौकातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मरणार्थ व बिनखांबी गणेश मंदीर येथे गेली पन्नास वर्षांपूर्वी या रस्त्याला स्वातंत्र्यवीर सावरकर चौक असे नाव होते परंतु महापालिकेच्या विकास कामाच्या आणि अतिक्रमणाच्या विळख्यात या चौकाचे नामकरण असलेला बोर्ड लुप्त पावला होता. ही बाब अखिल भारत हिंदू महासभा या वीर सावरकरांच्या कोल्हापूर संघटनेच्या लक्षात आली तात्काळ कोल्हापूर महापालिकेला कळवण्यात आले कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनास आज 100 वर कार्यकर्त्यांनी आंदोलन करत महापालिकेला जाग आणली आणि या आंदोलनाला यश आले. महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने नामकरण बोर्ड नवीन करणेबाबत आता मंजुरी दिली तसेच उपरोक्त ठिकाणचे अतिक्रमण हटवणेबाबत तेथील अतिक्रमण काढण्याबाबत महापालिका जबाबदार असेल असे सांगण्यात आले.
ताराबाई रोड येथील सरस्वती टॉकीज चौकात स्व.वि.दा. सावरकर चौकाचे नामकरण महानगरपालिकेच्या महासभेमध्ये साधारण २० वर्षापुर्वी बॉडी ठराव झाला आहे. हे प्रशासनास दाखवून देण्यात आली
ताराबाई रोड येथील सरस्वती टॉकीज चौकामध्ये सध्या बांगलादेशी विक्रेते यांचेकडून अतिक्रमण वाढले असून संपूर्ण चौकाला बकाळ अवस्था आली आहे. याठिकाणी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर स्मारक चौक नावाने बोर्ड असून ताराबाई रोडवर संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे भावीक, पर्यटकांची वर्दळ असते. परंतु या चौकातील सध्याची अवस्था पहाता भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेले अग्रणी स्वातंत्र्य सेनानी यांच्या स्मारकाची याठिकाणी होत असलेली दुरावस्था पाहून संपूर्ण राज्यभर याची चर्चा होत आहे. बिन खांबी गणेश मंदीर आणि सरस्वती टॉकीज चौक याठिकाणी लावलेला स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या बोर्डवरील रंगरंगोटी गेली असून बोर्ड खराब झालेले आहेत. येत्या २८ मे २०२५ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती असून देशभर हा उत्सव मोठया प्रमाणार केला जातो. कोल्हापूर येथे उपरोक्त ठिकाणी आम्ही अखिल भारतीय हिंदू महासभेचे कार्यकर्ते जयंती उत्सव आणि फोटो पूजन करणार आहे. यासाठी जिल्ह्यातून याठिकाणी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तरी याठिकाणी फुटपाथवर वाढलेले अतिक्रमण कायम स्वरुपी काढून उपरोक्त चौकाला पुर्वस्थिती प्राप्त करुन दयावी असे अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेने तात्काळ मंजुरी देऊन सदर आंदोलनास यश आलेले आहे यावेळी निवेदन देताना कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्ष स्वाती रजपूत महिला जिल्हा उपाध्यक्ष ज्योती बागडी रेणू पवार रूपाली गुरव प्राजक्ता बाचनकर स्वाती सुतार (महिला जनसंपर्क प्रमुख ) संजय तोरस्कर अखिल भारत हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष संदीप सासने संघटन मंत्री विजय बागडी धनाजी जाधव आदी उपस्थित होते.