कोल्हापूर चे नूतन पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता
कोल्हापूर – कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून नांदेडचे नागरी संरक्षण हक्क पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता हे रुजू होणार आहेत.
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून मे 2023 मध्ये महेंद्र पंडित हे रुजू झाले होते. दरम्यान आज त्यांची ठाणे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झालीय. गेल्या दोन वर्षात पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी चांगली कामगिरी बजावली होती. कोल्हापुरातील अवैध व्यवसायावर कारवाई करीत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
त्याचबरोबर अनेक गुन्ह्यांची उकल करून त्यांनी आपली वेगळी चुणूक दाखवली होती. गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात पार पडलेल्या निवडणुका,मोर्चे, आंदोलन त्यांनी योग्य पद्धतीने हाताळत कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखला होता.