महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अधिवेशन यशस्वी करा- राज्यअध्यक्ष विलासराव कोळेकर
पेठ वडगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने 1 जून रोजी अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठामध्ये होणाऱ्या राज्य रस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व राज्य अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार पेठवडगाव येथे झालेल्या जिल्हा बैठकीत करण्यात आला.
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने संघटनेचे राज्य अधिवेशन आणि राज्यातील सर्वच क्षेत्रातील काही मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्याचे नियोजन महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे. हा सोहळा संपन्न करण्याची जबाबदारी कोल्हापूर जिल्ह्याला मिळाली आहे.हा सोहळा रविवार दिनांक एक जून रोजी हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथल्या संजय घोडावत विद्यापीठामध्ये होणार आहे.
याआयोजित कार्यक्रमाचे नियोजन आढावा बैठक राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर, जिल्हा अध्यक्ष अनिल उपाध्ये याच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्याच्या उपस्थितीत पेठ वडगाव येथे पार पडली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून 400 हून अधिक पत्रकार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. नियोजनाच्या दृष्टीने काही कमिट्या स्थापन करण्यात आल्या.
स्वागत व प्रास्ताविक रमेश बोभाटे यांनी केले. सुत्रसंचालन बाबासाहेब नेर्ले यांनी केले.
यावेळी राज्य कार्यकरणी सदस्य राजकुमार चौगुले, सुनील कांबळे, आयुब मुल्ला, संतोष भोसले,संजय गायकवाड,विनय पाटील,शिवाजीराव शिंगे, शांतीकुमार पाटील, पापालाल सनदी, संतोष माळवदे, जय कराडे प्रकाश सावर्डेकर, उदय पाटील, भानुदास गायकवाड,संजय सुतार, दिपक पोतदार, संदीप कांबळे, उमेश माळगे,सागर जमणे, शरद माळी, प्रकाश कांबळे, प्रकाश पाटील, प्रदीप येवारे, अनिल निगडे, आदी मान्यवर उपस्थित होते.