Home Breaking News सिंधुदुर्ग येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संघटने  वतीने बाळशास्त्री जांभेकर...

सिंधुदुर्ग येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संघटने  वतीने बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

Advertisements

सिंधुदुर्ग येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संघटने वतीने बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

Advertisements

 

 

 

 

 

 

 

सिंधुदुर्ग,(प्रतिनिधी):- आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या 179व्या पुण्यतिथी निमित्त ओरस सिंधुदुर्ग येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सिंधुदुर्ग पत्रकार संघटना यांच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन पत्रकार भवनात करण्यात आले होते.अगदी सुसज्ज असे पत्रकार भवन सिंधुदुर्ग येथे बांधण्यात आले आहे.यावेळी प्रमुख पाहुणे पालकमंत्री ना.नितेश राणे, मा.खासदार निलेश राणे उपस्थित होते.

 

संस्थेचे प्रमुख विश्वस्त एस एम देशमुख,किरण नाईक,अध्यक्ष मिलिंद आष्टीकर,शरद पाबळे,शिवराज काटकर,सिंधुदुर्ग अध्यक्ष उमेश तोरसकर ,डिजिटल मिडिया चे अध्यक्ष अनिल वाघमारे सदस्य अनिल धुपदाळे विश्वंभर मुळे, जितेंद्र शिरसाट, आदि उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडियाची कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीस मंजुरी देण्यात आली.जिल्हाध्यक्ष पदी गणपती शिंदे,उपाध्यक्ष पदी अभिजित पटवा यांची निवड करण्यात आली.प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्र प्रदान करण्यात आली.

यावेळी विकास गायकवाड,जावेद मुल्ला,दादू सुतार यांच्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून पत्रकार बांधव उपस्थित होते.

Advertisements
Advertisements