ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलची सलग एकोणीस वर्ष दहावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा
पेठ वडगाव, : येथील ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलची सलग एकोणीस वर्ष इयत्ता दहावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा अखंड राहिली आहे. या परीक्षेत एकूण विद्यार्थी १०५ परीक्षेला बसले होते त्यापैकी १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विशेष श्रेणित १२ विद्यार्थी तर श्रेणीत २९ विद्यार्थी गुणानुक्रमे : मनिष पाटील ९६. २० टक्के, रुग्वेद पाटील- ९६. २० टक्के, मृणाली माळी ९४.०० टक्के,अनुष्का जाधव-९४.०० टक्के,शुभ्र सेन-९३.८० टक्के हे यशस्वी विद्यार्थी आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दत्तात्रय घुगरे,संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापिका सौ.एम.डी.घुगरे प्रशासक एम.एच.चौगुले सर व सौ.एस.एस.गिरीगोसावी, पर्यवेक्षक शरद जाधव, प्रशासक संतोष पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.