कोल्हापुर येथे रिपाइं च्या १७ मे रोजी होणाऱ्या मातंग परिषदेस इचलकरंजी व परिसरातून शेकडो मातंग बांधव उपस्थित रहाणार- सतिश माळगे
वाठार, प्रतिनिधी(प्रकाश कांबळे):-रिपब्लीकन पार्टी ॲाफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले साहेब हे १७ मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या उपस्थिती मध्ये तसेच त्यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक दसरा चौक कोल्हापूर येथे सायंकाळी ५ वाजता मातंग परिषदेचे आयोजन केले आहे या परिषदेच्या पुर्व नियोजनासाठी आज दि.१२/०५/२०२५ रोजी इचलकरंजी येथे सतिश माळगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी बोलताना सतिश माळगे म्हणाले ना.रामदासजी आठवले साहेब हे बहुजनांचे ह्रदय सम्राट आहेत डॅा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नंतर तळागळातील समाजाला न्याय देण्याचे काम एकमेव नेते रामदासजी आठवले साहेब हे करत आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी लढण्यास रिपब्लिकन पक्ष सदैव मातंग समाजाच्या मागे ठामपणे उभा आहे हे सांगण्यासाठी कोल्हापूर शाहूनगरीमधून या मातंग परिषदेचे आयोजन रिपब्लिकन पक्षाचे वतीने करण्यात आले आहे या मातंग परिषदेश इचलकरंजी तसेच परिसरातून शेकडो मातंग समाज बांधव उपस्थित राहणार असे मतं सतिश माळगे यांनी व्यक्त केल.
यावेळी जेष्ठ नेते किरण नामे,होलार समाजाचे जेष्ठ नेते राजू भडंगे,कुंडलीक कांबळे होलार आघाडी चे लक्षण पारसे(आण्णा),मातंग आघाडी चे बादल हेगडे,भारत पाथरचट,निखील मोरे,भीमा साठे,राहूल साठे,तानाजी चव्हाण,साहेब साठे,नारायन आगवणे,रोहित साठे,राहूल साठे,आकाश बेगडे,अवधूत हात्तीकर,अनमोल घाटगे,गौरव आदमाने,राहुल संजय घाटगे,राजेश तनपुरे,सागर भोसले,गणेश भोसले,अजित समदे,सुर्यकांत चौगुले यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.