बळवंतराव यादव विद्यालयाचा 10 वी बोर्ड परीक्षेचा सलग 15 व्या वर्षी शंभर टक्के निकाल
पेठवडगाव : येथील बळवंतराव यादव विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा सेमी व मराठी माध्यमाचा निकाल सलग पंधराव्या वर्षी शंभर टक्के लागला आहे.
विद्यालयाचे ३३९ पैकी ३३९ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.५९ विद्यार्थ्यांना ९० टक्यापेक्षा टक्के मिळाले आहेत.तसेच ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे १०९ विद्यार्थी आहेत.तर ७० टक्के पेक्षा जास्त टक्के मिळवून ९७ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल अनुक्रमे असा आर्या अवधूत वाटेगावे (९८.६०)द्वितीय-श्रेया सुनील सणगर(९८.४०), तृतीय विभागून राजवीर अजित पाटील,व यश योगेश कुलकर्णी (९८.००). मराठी माध्यमाचा अनुक्रमे निकाल असा- तन्वी रामचंद्र पाटील (९२.८०), उत्कर्षा शशिकांत बोंद्रे (९२.००), विघ्नेश प्रदीप सणगर(९०.४०) या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष व माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा विजयादेवी यादव, सचिवा विद्याताई पोळ, कार्यवाह अभिजीत गायकवाड, मुख्याध्यापक अविनाश पाटील, उपमुख्याध्यापिका मनीषा पोळ, पर्यवेक्षक मनोज शिंगे ,संताजी भोसले,पी.बी.पाटील तसेच सर्व वर्ग शिक्षक व विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन मिळाले.