वाठार मध्ये ऑपरेशन सिंदूरचा आंनदोस्तव शरण्या आत्मनिर्भर फाउंडेशन च्या वतीने दूध वाटप
वाठार, (प्रकाश कांबळे):- छत्रपती शिवरायांच्या युद्धनीती प्रमाणे गनिमी कावा करून भारताने पाकिस्तानात घुसून हवाई युद्ध करून ऑपरेशन सिंदूर पार पाडले यानिमित्त वाठार मध्ये एस टी स्टॅन्ड चौकामध्ये आज गुरुवार सायंकाळी सात वाजता शरण्या आत्मनिर्भर फाउंडेशन यांच्या सहकार्यातून दूध वाटप करण्यात आले यावेळी 150 लिटर दूध वाटप करून आनंदोस्तव साजरा करण्यात आला
*यावेळी बोलताना अध्यक्षा सौ प्रज्ञा भोसले म्हणाल्या कि भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून हवायुद्ध करून ऑपरेशन सिंदूर पार पाडले याबद्दल प्रथम भारतीय सैनिकांचे मनपूर्वक अभिनंदन त्यांनी केलेल्या या ऑपरेशन सिंदूर मुळे काश्मीर पहलगाव येथे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला त्याचबरोबर पाकिस्तानातील दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने चांगलाच धडा शिकवला आहे*
यावेळी शरण्या आत्मनिर्भर फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ प्रज्ञा भोसले, संचालक राजेंद्र चव्हाण, पत्रकार प्रकाश कांबळे,सौ राणी भोसले, सौ माया घोरपडे, विशाल माने,नामदेव पवार, रतन लोहार, जयसिंग लोखंडे, अजित पाटील, रणजीत माने यांच्यासह शेकडो लोक उपस्थित होते